शिरसोली : घरी कुणी नसताना एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोद करण्यात आली आहे.
खामगाव येथील मुळ रहिवासी व वीस वर्षांपासून ते शिरसोली प्र.न. राहत असलेले पंढरीनाथ नामदेव संनसे (वय ४५) यांनी आज घरी कोणी नसताना राहत्या घरात छताच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जैन कंपनीत ते कमला आहेत. त्यांनी घर बाधकामासाठी कर्ज काढलेले आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाही.
दरम्यान, याबाबत याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी,२ मुले व १ विवाहित मुलगी असा परिवार आहे.