मुंबई : कच्च्या तेलातील महागाईने नजीकच्या काळात देशात इंधन दरवाढीचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला असून आज पुन्हा पेट्रोल आणि डीझेलच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलची किंमत 29 पैशांनी वाढली आहे. मागील आठ दिवसात डिझेल २.१५ रुपयांनी तर, गेल्या पाच दिवसांत पेट्रोल १.२० रुपयांनी महागले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी गेले सलग चार दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ केली होती. या दरवाढीनंतर शुक्रवारी पेट्रोल दरात २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ करण्यात आली. शनिवारीही पेट्रोल दर २० पैसे आणि डिझेल दर २५ पैशांनी वाढवण्यात आला आहे. आता आज रविवारी पुन्हा पेट्रोल २५ पैसे, तर डिझेल ३० पैशांनी महागले आहे.
जळगावमधील दर
आज जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर चा दर १०९.३९ रुपये आहे. तर डीझेलचा प्रति लिटरचा दर ९७.८२ रुपये इतका आहे.
पेट्रोलियम जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.45 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.39 आणि 90.77 रुपये इतका आहे.















