भुसावळ | तालुक्यातील वराडसीम येथील दत्त मंदिर भागातील रहिवासी वसीम उर्फ मोहसीन भिकन पिंजारी (वय ३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी घडली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
या प्रकरणी अल्ताफ कदीर पिंजारी (वराडसीम) यांनी भुसावळ तालुका पोलिसांत खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तरुणाच्या आत्महत्येची माहिती मिळताच कुऱ्हा चाैकीचे युनूस मुसा शेख, राहुल महाजन, उमेश बारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तपास सहायक पाेलिस निरीक्षक अमोल पवार करत आहेत