अहमदनगर : जन्मदात्या नराधम पित्याने पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर संपूर्ण नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई बाहेरगावी गेली असताना 28 जुलैच्या रात्री बापाने 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी दोनवेळा लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने आईला दिली आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या संदर्भातील वृत्त लोकमत डॉट कॉमने दिलं आहे.
मुलगी रात्री झोपलेली असताना वडिलांनी तिचा गैरफायदा घेत लैंगित अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बापाला अटक केली आहे.