जळगाव : रितेश अशोक भाटिया यांचे दीर्घ आजाराने आज दुपारी निधन झाले. माँ अशापुरा सेवा केंद्राचे संचालक तसेच सरचिटणीस, जळगाव जिल्हा पत्रकार संघ व गुजराथी समाजाचे कार्यकर्ते, जीवनसाथी परिचय संमेलनाचे आधारस्तंभ, भाटिया समाजाचे कार्यकर्ते होते.
सर्व समाजात त्यांची ओळख होती. तसेच लाकडी गणपती मंदिर मोरया परिवारातील आधारस्तंभ होते. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, दोन मोठे काका, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याची अंतयात्रा राहत्या घरून बळीराम पेठ येथून नेरी नाका वैकुंठ धाम येथे संध्याकाळी ६.०० वाजता निघेल.