जळगाव : काल नशिराबाद येथे जुन्या वादातून धम्मप्रिय मनोहर सुरडकर या तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या खुनातील आरोपी शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय-२१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय-२१) दोन्ही रा. पंचशिल नगर यांना आज सकाळी अटक केली असता त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होत. यावेळी न्यायालयाने दोघांना २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हत्येच्या गुन्ह्यात ११ महिन्यांनी जामीन मिळाल्यानंतर धम्मप्रिय सुरडकर हा वडिल मनोहर सुरडकर यांच्यासह मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी क्रमांक (एमएच १९ एव्ही ९६५६) जात असताना शमीर आणि रेहानुद्दीन यांनी गोळीबार आणि चॉपर हल्ला केला. या हल्ल्यात धम्म सुरडकर हा जागीच ठार झाला होता. तर सोबत असलेले वडील मनोहर आत्माराम सुरडकर हे गंभीर जखमी झाले होत.
दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, धम्मच्या खुनातील आरोपी यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोघांना २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.