जळगाव प्रतिनिधी | तांबापुर भागातील पंचशीलनगरात राहणाऱ्या सर्फराज खान अय्युब खान पठाण यांच्या घरी १३ सप्टेंबर रोजी चोरी झाली होती. या गुन्ह्यात परिसरातच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी पकडले. या चोरट्याने पठाण यांच्या घरातून चोरलेले पैसे, सोने मेहरूण परिसरात जंगलात पुरून ठेवले होते.
खान यांच्या घरी चोरी झाल्याचे १४ रोजी उघड झाले. चोरट्याने १३ रोजी मध्यरात्री वरच्या मजल्याच्या खोलीसह शेजारच्या इतर घरांना बाहेरून कडी लावली. त्यानंतर खान यांच्या घराचा कडीकोयंडा तोडत कपाट फोडून १५ ग्रॅम सोन्याची पोत, चांदीचे कडे, चांदीची पोत, चांदीची अंगठी, १२ हजार रोख असा ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घटना उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलासह साेनू सलीम शेख (रा. तांबापुरा) याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
चोरट्यांनी जंगलातील झाडाखाली चोरीचा ऐवज लपवून ठेवला होता. दाेघे चाेरटे दोघे मेहरूणच्या जंगलात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, सुधीर सावळे, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांनी जंगलातून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. तर साेनू शेख हा पसार झाला आहे.