ठाणे,दि.१२ – मुंबई,अमरावती येथील बलात्काराच्या घटणांनी महाराष्ट्र हादरलेला असतांना आता ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे १४ वर्षीय मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुन्हा राज्य हादरून गेलं आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका नराधमाने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका पडक्या घरात बलात्कार केला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.