अमरावती,(प्रतिनिधी) – मुंबई येथील साकीनाका येथे घडलेल्या बलात्काराच्या अमानवीय अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेचा आज दुर्दैवी मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत असतानाच राज्यात अजून एक धक्कादायक घटना समोर आली असून अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने अमरावतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे.
अमरावतीमधील येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन बलात्कारानंतर सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे .पीडितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.