ब्राम्हणपुरी : ओव्हरटेकच्या नादात आयशर ट्रकने समोरुन येणाऱ्या पिकप गाडीस जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर ट्रक चालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शहादा खेतीया रस्त्यावर ब्राम्हणपुरी गावाजवळ घडली. जखमींना तात्काळ ग्रामस्थांनी म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याबाबत असे की, शहादयाकडून खेतिया मध्यप्रदेशकडे हिरवी मिरची भरून जाणारी आयशर ट्रक क्रमांक ( एम. एच.१८,बीजी.- ७७५९) ब्राम्हणपुरी गावाजवळ ओव्हरटेक करीत असतांना त्याच दरम्यान खेतियाकडून शहादयाकडे मिरची भरुन येणाऱ्या पिकप वाहन क्रमांक( एम. पी. जी.२३०५ ) ला जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता मोठी होती. यात दोन्ही गाड्यांच्या चालकाच्या केबिनच्या चक्काचूर झाला.
अपघातात आयशर ट्रक चालक कपिल बाबूलाल गंगवाल (रा.बडीथाना ता.राजपुर जि. बडवाणी,मध्यप्रदेश) याच्या जागीच मृत्यू झाला.तर पिकअप चालक व क्लीनर प्रविण करसन यादव ( वय २८,रा.रामपुरा ता. कसरावद जि. खरगोन, मध्यप्रदेश), लवकुश रामकरन यादव (वय ३०,रा.नवलपुरा ता. खरगोन,मध्यप्रदेश)दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ ब्राम्हणपुरी येथील ग्रामस्थांनी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ यांसह कर्मचाऱ्यांनी भेट दिली.दरम्यान जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.