मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबई सारख्या शहरात महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर पीडित महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असतांना ‘त्या’ पीडित महिलेचा आज मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईतील राजावाडी रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरू होते. पीडित महिला रुग्णालयात दाखल केल्यापासून बेशुद्धचं होती.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक होती.पीडित महिलेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र दुर्देवाने तिचा मृत्यू झाला.
नराधमांनी आधी बलात्कार केला आणि नंतर नराधम आरोपींनी महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवून जखमी करत अमानवीय कृत्य केल्याची प्राथमिक माहिती होती.महिला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून आणखी काही आरोपी या गुन्ह्यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.