चोपडा : येथील फुले नगरातील रहिवासी संजय पुंजू चव्हाण (वय ४८) याने कौटुंबीक वादातून पत्नी मीराबाई चव्हाण (वय ४०) हिच्या उजव्या पायाच्या मांडीवर विळ्याने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मीराबाईंचा मृत्यू झाल्याची घटना ५ रोजी सायंकाळी घडली.
संजय चव्हाण व पत्नी मीराबाई संजय चव्हाण यांच्यात कौटुंबीक वादातून तीन दिवसांपासून घरात कलह सुरू होता. ५ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या वादातून संतापात संजय चव्हाण याने पत्नी मीराबाई्या उजव्या पायाच्या मांडीवर विळ्याने वार करून गंभीर दुखापत केली. तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलगा सागर चव्हाण याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.