मुंबई : भांडवली बाजारातील तेजीने कमॉडिटी बाजार झाकोळला होता मात्र आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये मोठी उसळी दिसून आले. सोने जवळपास ४९६ रुपयांनी तर चांदीमध्ये १८६९ रुपयांची वाढ झाली.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६१९० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४७१९० रुपये झाला आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३४० रुपये इतका झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०५७० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४९६० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९०५० रुपये आहे. त्यात ४९० रुपयांची वाढ झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९३४० रुपये आहे.
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.