जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पांडे चौकात रंगकाम करीत असताना एका ४० वर्षीय तरुणाला इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बाबुलाल बनीमियॉ पटेल (वय-४०) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील तांबापूरा भागात बाबुलाल पटेल हे आई-वडील तीन भाऊ, पत्नीसह राहतात. पेंटर काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, पांडे चौकातील सुरेंद्र नथमल लुंकड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करत होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास रंगकाम करून पत्र्याच्या शेडवरून सीडीने खाली उतरत असतांना त्यांचा हाताला इलेक्ट्रीक वायरला धक्का लागल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताच्या पश्चात आई अबीदाबी, पत्नी फरीदा, फरान, सना, शहिन हे तीने मुले आणि लतीफ, हारून आधि शरीफ हे तीन भाऊ असा परिवार आहे