जळगाव : एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी घडली आहे. रोहन इंदरलाल मेहता वय-२४ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, रोहन याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाही.
याबाबत असे की, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणारा रोहनचे एलएलबीचे शिक्षण झाले आहे. कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने तो मुंबई येथून जळगावी परतला होता. जळगावात कुटुंबीयांनी त्याला बळीराम पेठेत साड्यांचे दुकान टाकून दिले होते. रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे उठला, वृत्तपत्र वाचन करून पुन्हा बसला.कुटुंबीय घराबाहेर गेलेले असताना त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
रोहनची आई सुनीता ८ वाजून १० मिनिटांनी घरी परतल्यावर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली.