जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान, आता शहराती गणपती नगरातून एकाला दुचाकी चोरताना रंगेहात पकडले आहे. राजूल गणेश महाजन (वय-२०) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सचिन प्रतिमदास जेठवाणी (वय-३५) रा. गणपती नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी राजूल महाजन हा सचिन जेठवाणी यांची दुचाकी (एमएच १९ डीसी ५७११) घेवून जात असतांना त्याला रंगेहात पडकले.
नागरीकांना त्याला चांगला चोप दिला असून रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आाले आहे. याप्रकरणी सचिन जेठवाणी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशील चौधरी करीत आहे.