भुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथील विवाहिता अश्विनी किशाेर चाैधरी हिने पंख्याला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली तर, दोघा चिमुकल्यांना आत्महत्येपूर्वी विषारी कीटकनाशक पाजल्याचा संशय आहे. दोन्ही मुलांवर उपचार सुरू असून, त्यापैकी एक मुलगा गंभीर आहे. दरम्यान,विवाहितेच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही.
अश्विनीचा पती किशोर खासगी फायनान्स बँकेत नाेकरीला हाेता. लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने तो शेती करत असे. अश्विनीने बुधवारी सकाळी १०.१५ ला आत्महत्या केली तेव्हा श्रेयस (वय ९) आणि प्रणव (वय ३) हे मुलेही घरीच होते. श्रेयस रडत बाहेर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दोन्ही मुलांना उलट्या झाल्याने त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. त्यांना कीटकनाशक दिल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रेयसची प्रकृती गंभीर आहे.