न्याहळोद (धुळे) : आर्थिक विवंचनेतून लसूण, भाजीपाला विक्रेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी घडली. कैलास बाबूलाल खैरनार (वय ५१) असे आत्महत्या केलेल्या विक्रेत्याचे नाव आहे.
न्याहळोद धुळे कापडणे रस्त्यालगत अंजनाबाई महाजन यांच्या शेताच्या बांधावर भोकरच्या झाडाला गाडा बैलच्या जोतच्या साह्याने गळ्याला दोर बांधून आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. काही दिवसापासून त्यांना आर्थिक विवंचनेची अडचण भासत होती. असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.
कैलास खैरनार यांचा मृतदेह खाली उतरवताना खिशातून चिठ्ठी निघाली. त्यात उल्लेख केला असून माझा आत्महत्येच्यामागे मुलाचा, सून, मुलीचा, आई- वडिलांचा व पत्नीचा कोणाचाही दोष नाही. मी माझ्या इच्छेनुसार मरत असल्याचा उल्लेख करत खाली आपलाच कैलास खैरनार अशी सही केली आहे.
त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे. ते बाबूलाल खैरनार यांचे पुत्र तर ज्ञानेश्वर खैरनार यांचे वडील होत.