चाळीसगाव प्रतिनिधी :- एका ३५ वर्षीय तरुणाने शेतातील शेडच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी तालुक्यातील भोरस शिवारात घडली. प्रदीप अर्जुन पाटील (३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
प्रदीप पाटील हा तरूण गुरुवार दि .१९ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या पूर्वी भोरस बुद्रूक शिवारातील त्याच्या शेतातील शेडमधील अँगलला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला . त्याच्या आत्महत्येचे कारण समजून आले नाही. याप्रकरणी प्रदीप धनराज पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार दत्तात्रय महाजन हे करीत आहेत.