रावेर : तालुक्यातील दोधे येथील एका 23 वर्षीय युवतीवर नोकरीच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी खानापूर येथील सेट्रल बँक आँफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
दोधे येथील 23 वर्षीय युवतीच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी नितीन यशवंत शेंडे यांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जवळीक साधून शारीरीक संबध ठेवल्याने रावेर पोलिसात आरोपीविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, उपनिरीक्षक मनोहर जाधव करीत आहेत.