जळगाव प्रतिनिधी । पैशांसाठी विवाहितेचा छळ करण्यात येत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, दुचाकी घेण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील मंडळींविरोधात जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील आवार येथील माहेर असलेल्या पुजा अमोल मगरे (वय-२१) रा. गोद्री फत्तेपुर ता. जामनेर जि.जळगाव यांचा विवाह ऑगस्ट २०२० मध्ये अमोल ईश्वर मगरे यांच्याशी रितीरिवाजा नुसार झाले. लग्नानंतरचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर लहान लहान कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. पती अमोल मगरे याने माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करण्यास सुरूवात केली.
यासाठी सासरकडील मंडळी प्रोत्साहन देत होते. सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहिता पुजा यांनी पतीसह सासरकडील मंडळीविरोधात जळगाव तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अमोल मगरे, सासू शोभाबाई ईश्वर मगरे आणि चुलत सासू जिजाबाई मगरे सर्व रा. गोद्री फत्तेपुर ता. जामनेर जि. जळगाव यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात स्त्री अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे.