जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनीतील एका ३५ वर्षीय तरुणाने ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आलीय. जुबेर मोहम्मद हनीफ खाटीक (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, महिन्याभरापुर्वीच त्याच्या पत्नीने गळफास घेतला होता. कर्जाला कंटाळून खाटीक दाम्पत्याने आत्महत्येचा मार्ग पत्कारल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सुप्रीम कॉलनीतील रहिवासी जुबेर खाटीक हा तरुण रिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवत होता. पत्नी नजमाबी या देखील बचतगटाचे काम करुन तसेच भिशी चालवत होत्या. कुटूंबाला हातभार लावत होती. बचतगटाचे कर्ज बाजारी झाल्या. या विवंचनेमुळे नजमाबी यानी गेल्या महिन्यातच स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्त्या केली होती. मयत जुबेरच्या पश्चात दहा वर्षीय मुलगी नुजहत असून महिन्याभरात चिमुरडी अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी रुग्णालयात उपस्थिती देत पुढील कार्यवाही केली. प्राथमिक तपास पोलिस नाईक अतुल पाटील करीत आहेत.