जळगाव (प्रतिनिधी) – दहा दिवसापूर्वीच विवाह संपन्न झालेल्या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजलेले नसून शहर पोलीस स्टेशनला याबाबत नोंद करण्यात आली आहे.
करीना सागर निकम (वय १९) रा. रमाबाई नगर, दांडेकर नगर, दूध फेडरेशनजवळ असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचा ११ जुलै २०२१ रोजी सागर राजू निकम याच्याशी नुकताच १० दिवसांपूर्वी रमाबाई नगर येथे विवाह झाला होता. करीना सागर निकम हीने आज सकाळी १०. ३० वाजेच्या सुमारास घरात कोणीच नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी सासरे राजू निकम, पती सागर निकम हे कामावर गेले होते. दिर नागेश निकम घरात झोपलेला होता.सासुबाई निर्मलाबाई निकम बाहेर होत्या.अशी माहिती मिळत आहे.याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. करीना हीचे माहेर यावल तालुक्यातील न्हावी येथील आहे.याबाबत शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी तपास करीत आहे.