चाळीसगाव प्रतिनिधी, लवकरच चाळीसगाव नगरपालिका नगरसेवक सदस्य पदाची मुदत संपत आहे त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात चाळीसगाव नगरपालिका निवडणूका मध्ये इच्छुक विश्वकर्मीय बांधवांचे मनोबल वाढवून समाजातील १० इच्छुक बांधवाना उमेदवारी देवून राजकीय अस्तित्वाची लढाई लढायची आहे.
यासाठी तुषार सुर्यवंशी यांनी सर्वपक्षीय विश्वकर्मा (सुतार-लोहार) समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन केले होते..
यात सर्व समाज मिळुन विश्वरचियता फाऊडेशनची स्थापना करुन,अध्यक्षपदी हिम्मत निकम तर सचिव पदी तुषार सुर्यवंशी यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली
समाजातील जास्तीत जास्त नगरसेवक कशा पद्धतीने निवडून आणता येतील याबाबत चर्चा करण्यात आली त्याप्रसंगी मोठ्या संख्येने महाराष्ट्र विश्वकर्मा सेना पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते यावेळीजेष्ठ समाजसेवक साहेबराव वाघ,अरूण वाघ, युवा सेना मविसे प्रदेश संघटक भुषण सुर्यवंशी ,जिल्हा उपाध्यक्ष संजय हिरेकर,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शार्दुल,उपाध्यक्ष जगदीश शिंदे,सचिव राहूल सोनवणे ,शहराध्यक्ष दिपक शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव,किरण शार्दुल,सावकार शिंदे,योगेश वाघ,आदि उपस्थित होते.