ठाणे,(प्रतिनिधी) – ठाणे परिसरात मुसळधार पावसाने कहर केला असून कळवा पूर्व भागातील घोळाईनगर डोंगर परिसरात दरड कोसळून एका कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. यात 3 वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे.
ठाणे परिसरातील कळव्यात घोळाईनगर झोपडपट्टी भागात आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान दरड कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. ठाण्याचे आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

