केरळ – भारतातील कोरोना झालेली पहिली रुग्ण पुन्हा करोना पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आले आहे.प्रवास करण्या अगोदर त्या पहिल्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी केली त्यावेळी ती पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे सदर रुग्णवर घरीच उपचार सुरु असल्याचे समजते.
याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली असून त्या पहिल्या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाला कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाला आहे. त्या रुग्णाची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती पण त्यात संसर्ग झालेला नसल्याचं दाखवण्यात आलं होतं मात्र नंतर त्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यात ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
तिच्यात करोनाची कुठलीही लक्षणं दिसून येत नसल्याचे त्रिशूरच्या डीएमओ डॉ. रिना यांनी दिली आहे.भारतात पहिली कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली रुग्ण असलेली विद्यार्थींनी शिक्षणासाठी नवी दिल्लीला येथे जाणार होती. प्रवास करते समयी कोविड चाचण्या आवश्यक असल्याने या दरम्यान तिची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात तिला करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.