चाळीसगाव(प्रतिनिधी)- दिनांक 12 जुलै रोजी चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे चाळीसगांव येथे पत्रकारांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाडी हे होते.
या कार्यक्रमात चाळीसगाव शहरात कोरोनाच्या महामारीत अन्नदानाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली असे वर्धमानभाऊ धाडीवाल आणि रेशनच्या माध्यमातून गरिब व गरजु व्यक्तींना धान्य पुरवणारे पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार संदेश निकम हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष सत्कारार्थी होते, यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात चाळीसगाव येथील पत्रकार आर. डी. चौधरी, एम.बी. पाटील, जिजाबरव वाघ, महेंद्र सूर्यवंशीस, किशोर शेवरे, खेमचंद कुमावत, आनंद गांगुर्डे, रणधीर जाधव, आकाश धुमाळ, सोजीलाल हडपे, रोहित शिंदे, योगेश मोरे, नारायण परदेशी, विकी पाणकर, दीपक गडरी या पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला चाळीसगांव तालुका वृत्त पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव एम. बी. पाटील. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, गणेश अप्पा गवळी यांची विशेष उपस्थिती होती. सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनखाली आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी पत्रकार जिजाबराव वाघ सर यांनी केले तर आभार खेमचंद कुमावत यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

