जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसेंची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची मुंबई येथे आज ( दि. ८ जुलै २०२१ ) होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादीकडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी भूखंड प्रकरणी ईडी ने अटक केली दरम्यान पाच दिवसाची कोठडी सुनावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकनाथराव खडसे हे आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधणार होते.असेल राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कळविण्यात आले होते.खडसे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र त्यांची प्रकृती खालवल्याने आज मुंबई होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादी पक्षाने आपल्या ट्विट हॅण्डलवरून कळविले आहे.

