मुक्ताईनगर दि 22, (प्रमोद सौंदाणे)- वार्ताहर दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात एका वृद्धावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले होते त्यातील चार आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती परंतु चौथा आरोपी हा गर्दीचा फायदा घेत पोलिसांना चकमा देत फरार होण्यात यशस्वी झाला होता परंतु अप्पर पोलीस अधीक्षक श्री गवळी मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड तसेच मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज चौथ्या आरोपीच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती परविन तडवी पोलीस कॉन्स्टेबल मोतिलाल बोरसे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे पोलीस कॉन्स्टेबल गोपीचंद सोनवणे असे एक विशेष पथक मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे रवाना करण्यात आले होते.
सदरचे पथकास गुप्त माहिती मिळाल्यावरून हे पथक आज सकाळी बर्हाणपूर येथील लालबाग मिल चाळ परिसरात त्या गुन्ह्यातील चौथा फरार आरोपी अनिल पैलवान हा आढळून आल्याचे समजले होते परंतु या पथकाला पहिल्या फेरीत निराशा हाती आली परंतु त्यानंतर लगेचच काही तासातच पुन्हा गुप्त माहिती मिळाल्याने दुसऱ्यांदा या पथकाने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे तपासा ची चक्रे गतिमान करता बरोबर अनिल पहिलवान उर्फ अनिल अशोक सोनवणे यास मिल चाळ लालबाग येथून पोलीस पथकाने शिताफीने अटक केली व
अशाप्रकारे अखेर त्या फरार आरोपीच्याही मुसक्या मुक्ताईनगर पोलिसांनी आवळल्या दरम्यान या घटनेतील पहिल्याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेले अटक करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.