चाळीसगाव (प्रतिनिधी)- शनिवार दिनांक 19/06/2021 रोजी दुपारी गुड शेफर्ड अकॅडमी चाळीसगाव येथे चाळीसगाव तालुक्यातील सर्व खासगी व स्वयं अर्थसहाय्यित शाळेची बैठक पार पडली यात शासनाने नुकताच काढलेला इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वयाच्या दाखल्यावर प्रवेश देता येईल या ग्रुप च्या चुकीच्या बाबींचा व चुकीच्या प्रचाराचा विरोध करण्यात आला. शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वे जे शाळा बाह्य विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाच वयानुसार प्रवेश देता येतो. व त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणता येते. परंतु या परिपत्रकामुळे पालक खाजगी व स्वयंअर्थसहायित शाळेची मागील वर्षाची देय रक्कम न भरताच दाखला न घेताच अन्य शाळेत प्रवेश घेऊ शकता असा चुकीचा गैरसमज. पसरवला जातो व त्याचा प्रचार केला जातो याबाबत विरोध दर्शवला.
शासकीय शाळेन प्रमाणेच सदर शाळेंन मध्ये देखील शिक्षक ऑनलाइन काम करत असल्याने शिक्षकांचा पगार तसेच बिल्डिंग साठी, भौतिक सुविधांसाठी, तसेच स्कूल बस साठी शाळेस देखील ई एम आय भरावा लागतो. या सर्व खर्चासाठी शासनातर्फे कोणतेही अनुदान दिले जात नाही. सदर खर्च हा विद्यार्थ्यांच्या फी मधूनच केला जातो.
म्हणून अशा पद्धतीच्या परिपत्रकाद्वारे पालकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवण्याचा निषेध सर्व शाळेंन मार्फत करण्यात आला.
सदर बैठकीस गुड शेफर्ड अकॅडमी चाळीसगाव, ग्रेस अकॅडमी चाळीसगाव, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव, भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव, अग्निज इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव, श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल चाळीसगाव, जिजामाता इंटरनॅशनल स्कूल आडगाव, अश्वमेध पब्लिक स्कूल टाकळी प्र दे, यशवंत पब्लिक स्कूल वाघळी, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल बोरखेडा, हरिओम पब्लिक स्कूल दहिवद इ. संचालक हजर होते.