यावल (दिपक नेवे)- येथील तहसील कार्यालयात आज आपल्या कुटुंबाचे आधार कमविता व्याक्ति गमावलेल्या दारिद्रय रेषेखालील १२ कुटुंबप्रमुख महीला लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश प्रमाणे २ लाख ४० हजाराची मदत तहसीलदार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलीत. दरम्यान दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमाविते व्याक्तीचे नैसर्गिक निधन झालेल्या कुटुंबातील पालन करता आईस शासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबास राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेव्दारे २० हजार रुपयांची मदत करण्यात येते .
यावेळी यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते व निवासी नायब तहसीलदार आर के पवार , संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे , संगोयोचे अव्वल कारकुन रविन्द्र मिस्त्रि यांच्या प्रमुख उपस्थित सुलोचना गोकुळ सपकाळे रा . उंटावद, संगीता संतोष अडकमोल रा . दहिगाव , वंदना अशोक सोनवणे रा .किनगाव खु , ज्योती संतोष सांळुके रा . किनगाव बु , सुशिला मधुकर अढागळे रा . दहिगाव, मरूबाई सलीम तडवी रा . सावखेडासिम, रजिया महेमुद तडवी रा. सावखेडासिम, कल्पना पन्नालाल सोळंके रा . न्हावी प्र. अडावद , योगीता किशोर पाटील रा . साकळी , अलका धनसिंग कोळी रा डांभुर्णी , शोभा युवराज सोनवणे रा .डांभुर्णी आणी आशाबाई मच्छिंद्र भालेराव रा .थोरगहाण यांचा यात समावेश आहे .