मुंबई – दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबात सरकारची भूमिका ठाम असल्याचं विधान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज माध्यम प्रतिनिधी सोबत बोलतांना केलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने १० वी च्या परीक्षा बाबत फेरवीचार करण्याबाबत सरकारला विचारणा केल्यानंतर आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड माध्यमांसमोर बोलत होत्या त्या म्हणाल्या की, मे.उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर अधिकचा परिणाम होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आमची बाजू न्यायालयासमोर मांडणार आहोत. सध्याची कोविड संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे.याबाबत मुंबई उच्च न्यायालय सहानुभूतीनं निर्णय घेईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.