शंभर कोटीच्या कथित वसुली प्रकरणी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी सीबीआय ने छापेमारी केली व जवळपास १० तास अनिल देशमुख यांची चौकशी केल्याचं समजतं.
दरम्यान चौकशी संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहिलं ट्विट करून सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो असल्याची माहिती दिली.
आज अचानक पणे वाझे प्रकरणी कथित वसुली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी व कार्यालयाच्या ठिकाणी एकाच वेळे सीबीआय ने छापे मारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तर भाजप सरकारी संस्थांचा असा गैरवापर करून राजकारण करत असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरोप केला.