Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

najarkaid by najarkaid
May 5, 2021
in जळगाव
0
18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 5 – राज्य शासनाने 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरीकांना मोफत कोरोना लस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात 1 मे, 2021 पासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील 2 हजार 841 नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी या वयोगटातील नागरीकांनी कोविन ॲपवर नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. त्यानुसार शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती व ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. तर 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून लसीच्या उपलब्धतेनुसार जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयात नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन लस घेण्यासाठी पुढे येत आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस महत्वपूर्ण असल्याने राज्य शासनाने 1 मे पासून राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरीकांचे मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरीकांसाठी जिल्ह्यात रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, जळगाव शहर महानगरपालिकेचे शाहू महाराज रुग्णालय व नानीबाई आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद अशी एकूण पाच केंद्र सुरु केली आहेत.

या पाच केंद्रावर दैनंदिन 100 पुरुष व 100 महिलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील टप्प्यात ही केंद्र वाढवण्याचे नियोजन राज्यस्तरावर सुरू आहे. जिल्ह्यात या केंद्रावर पहिल्या दिवशी (1 मे) 411, दुसऱ्या दिवशी (2 मे) 695, तिसऱ्या दिवशी (3 मे) 769 तर चौथ्या दिवशी (4 मे) 966 व्यक्ती असे एकूण 2 हजार 841 व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

18 ते 44 वयोगटात मर्यादित स्वरूपात व फक्त आगाऊ ऑनलाइन नोंदणीद्वारे लसीकरण सुरू आहे, यात लसीकरण केंद्रावर नोंदणीचा पर्याय उपलब्ध नाही. यामुळे नोंदणी व लसीकरण केंद्रावर या वयोगटातील नागरिकांनी संयम बाळगून आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन करणेत येत आहे. याशिवाय नियमित शासकीय केंद्रांवर 45 हुन अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार आहे. यात दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांना वेगळा कोटा देण्यात येत आहे.

जिल्ह्यात तीन लाख लाभार्थ्यांचे लसीकरण…

जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 48 हजार 998 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 59 हजार 108 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सर्वसामान्य नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा साठा मिळावा यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-19 नोडल अधिकारी डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवेदन… काय म्हणाले वाचा

Next Post

माजी मंत्री गिरीश महाजणांनी २० टन ऑक्सिजन जळगाव जिल्ह्याकरिता करून दिला उपलब्ध

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
माजी मंत्री गिरीश महाजणांनी २० टन ऑक्सिजन जळगाव जिल्ह्याकरिता करून दिला उपलब्ध

माजी मंत्री गिरीश महाजणांनी २० टन ऑक्सिजन जळगाव जिल्ह्याकरिता करून दिला उपलब्ध

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us