मुंबई,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना पोटाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) काल पुन्हा एकदा दाखल झाले आहे.
शरद पवार यांच्यावर आज सोमवारी रोजी आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होतं होता. त्यामुळे आणखी एका शस्त्रक्रियेसाठी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून सांगितलं आहे.