जळगाव,(प्रतिनिधी)- कोरोना चा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने आज जळगाव जिल्ह्यात ऑक्सीजन बेड 1248 तर आयसीयू बेड 771 ने वाढविले असून जिल्ह्यात सध्या एकूण 16836 बेड उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने ट्विट करून दिली आहे.
ऑक्सिजन बेड्स २०१९ वरून ३२६७ झाले आहेत तर आयसीयु बेड्स ३२२ वरून १०९३ झाले आहे. जिल्ह्यात आता एकूण १२८५४ वरून १६८३६ झाले आहे.
गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असतांना बेड्स अपुरे पडत असल्याने मोठी तारांबळ उडाली होती. अनेक ठिकाणाहून रुग्ण व नातेवाईकांच्या बेड्स उपलब्ध होतं नसल्यानं ओरड होतं होती.
दरम्यान प्रशासनानं याबाबत गंभीर दखल घेतली होती, बेड्स वाढविण्याबाबत प्रशासन काम करत होते आज अखेर ऑक्सिजन बेड्स, आयसियू बेड्स ची संख्या वाढविण्यात आली आहे यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.