- वरखेडे-लोंढे प्रकल्प राज्यात सर्वाधिक कमी कालावधीत पूर्ण होणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार
- येत्या वर्ष अखेर होणार पूर्ण :: खासदार उन्मेष पाटील यांनी कार्य स्थळी दिली भेट : कामकाजाचा घेतला आढावा
- आधुनिक टेलीबेल्ट मशिन मुळे दररोज विक्रमी बारा हजार सिमेंट गोणीचे कॉंक्रीटीकरण
- विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या भेटीचा ओघ सुरूच
- केंद्राच्या बळीराजा संजीवनी योजनेत समावेश झाल्याने ५२६ कोटींची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता.
- खासदार उन्मेश पाटील यांचा भक्कम पाठपुराव्याला यश
चाळीसगांव – सुमारे साडे पस्तीस दशलक्षघनमीटर पाण्याची साठवण क्षमता असलेला चाळीसगाव तालुक्यातील 22 गावे व भडगाव तालुक्यातील 11 गावांना पिण्याच्या पाण्याचा तसेच या क्षेत्रातील 7542 हेक्टर जमिनीला जलसिंचनाचा फायदा देणारे आधुनिक पद्धतीने साकारले जाणारे वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्पावर एक टेलीबेल्ट , तीन क्रेन,दोन ब्ले चींग मशिन प्लांट या अत्यंत आधुनिक मशीन च्या साह्याने उर्वरित कॉंक्रिटीकरण रात्रंदिवस सुरू असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे. राज्यात शंभर टक्के निधी उपलब्ध असलेला व अवघ्या एका वर्षात पूर्ण होणारा ,तळाला अठरा मिटर वाळू मुळे काम करणे शक्य नसताना समुद्रात वापरले जाणारे शिट फाईल तंत्रद्यानाचा होणारा वापर, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे मनुष्यबळ तंत्रज्ञ , चार हजार मेट्रिक टन वजनाच्या लोखंडी वक्राकार दरवाजे अशा अनेक वैशिष्टे असलेल्या या प्रगतीपथावर असलेल्या वरखेडे लोंढे बँरेजचे काम राज्यात सर्वाधिक कमी कालावधीत पूर्ण होणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे.
खासदार उन्मेष पाटील यांनी घेतला आढावा
आज येथील कामकाजाची प्रगती व आढावा घेण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी भेट दिली यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तथा मुख्य अभियंता एच डी कुलकर्णी,अधीक्षक अभियंता आनंद मोरे ,कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे,प्रकल्पाचे ठेकेदारांचे तांत्रिक सल्लागार पी आर पाटील ,सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटील. पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, माजी सदस्य दिनेश बोरसे, आत्मा कमेटी अध्यक्ष रवींद्र चौधरी,जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव , जीप सदस्य अनिल गायकवाड ,युवा मोर्चाचे कपिल पाटील, ऍड राजेंद्र सोनवणे ,नरेंद्रकाका जैन, शिवदास महाजन ,पंचायत समिती सदस्य सुनील पाटील,रविआबा जामदेकर, उदय पवार, भाजपा सरचिटणीस अमोल नानकर , शरद पाटील यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या भव्यदिव्य कामाची प्रगती मनाला सुखावणारी असून तालुक्यासह भडगाव परिसरातील गावांना जलसिंचनाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार असल्याने समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बारा हजार गोणीचे दररोज कॉंक्रीटीकरण
तालुक्यातील वरखेडे येथे गिरणा नदीवर असलेल्या वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्पावर एक टेलीबेल्ट , तीन क्रेन, दोन ब्लेचींग मशिन प्लांट या अत्यंत आधुनिक मशीन च्या साह्याने उर्वरित कॉंक्रिटीकरण रात्रंदिवस सुरू असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे यसाठी दररोज सुमारे बारा हजार गोणी सिमेंट चे काँक्रिट काम केले जाते आहे. या ठिकाणी गेल्या महिन्यात अत्याधुनिक कंपनीचे टेलीबेल्ट नावाचे पन्नास मिटर दूरवर तसेच खोलवर कॉंक्रीटीकरण करणारे आधुनिक मशीन आल्याने 50 मीटर लांब होणारे कॉंक्रिटीकरण अत्यंत गुणवत्तापूर्वक केले जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे.पाणी अडविण्यासाठी लागणाऱ्या वक्राकार लोखंडी दरवाजे तयार करण्याचे पूर्ण झाले असून सुमारे चार हजार मेट्रिक टन इतके लोखड त्यासाठी वापरण्यात आले आहे. सुमारे पाचशेपेक्षा अधिक कामगार कर्मचारी ,शंभर अधिकारी ,अभियंते या साईट वर काम करत असल्याने लवकरच बॅरेजचे काम वर्ष अखेर पूर्ण होणार आहे
खासदार उन्मेश पाटील यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे लवकरच काम पूर्णत्वास -कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे
वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्पास २०१४ नंतर गती मिळाली वरखेडे धरणासाठी संपादित होणाऱ्या वनजमिनीची मोबदला रक्कम पोटी आजवर १५ कोटी १६ लक्ष रुपये अदा करण्यात आले आहेत.
तसेच २९ ऑक्टोंबर २०१४ रोजी प्रकल्पास पर्यावरण मान्यता प्राप्त मिळाली तसेच २२ जानेवारी २०१५ शासनाच्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची (SLTLC) मान्यता प्राप्त झाली होती. त्याच प्रमाणे२०१४ नंतर नदीच्या दोन्ही तीरावरील बांधकामे (NOF) पूर्ण करण्यात आली आहेत.
प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण ३३४ हेक्टर खाजगी जमिनीचे भूसंपादन प्रस्ताव मंजूर होऊन संयुक्त मोजणीच्या कामास लगेच सुरुवात होत आहे.
या प्रकल्पाचा द्वितीय सुधारित प्रकल्प अहवाल रु.५२६.६४ कोटी किमतीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. सदर प्रकल्पाचे मागील वर्षी पावसाळ्यानंतरचे बांधकाम नोव्हेंबर २०१७ रोजी सुरु करण्यात आले असून प्रकल्पाच्या साईटवर संपूर्ण अत्याधुनिक मशिनरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच पावसाळ्यात व नदीला आवर्तन सुरू असताना देखील काम सुरू राहण्यासाठी अत्याधुनिक शीट फाईल तंत्रज्ञान प्रकल्पाच्या ठिकाणी वापरले जात आहे. त्यामुळे कामाची प्रगती पाहता या वर्ष अखेर पाणी अडविले जाईल असा विश्वास प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
शंभर टक्के निधी मंजूर झाल्याने युद्ध पातळीवर काम -तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील
केंद्र शासनाच्या बळीराजा कृषी संजीवनी योजनेत समाविष्ठ होण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या वडोदरा कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यास मंजुरी मिळून 405 कोटी इतका भरीव निधी प्राप्त झाला आहे. उपखेड,वरखेड, सेवानगर पिलखोड,तामसवाडी या गावांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे तसेच उपखेड वरखेडे पिलखोड तामसवाडी ही गावे धरण प्रभावक्षेत्रात येणार असून चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील 25 हुन अधिक गावांना त्याचा फायदा होणार आहे.सदर धरणावरून अत्याधुनिक बंदिस्त पाईपलाईन द्वारे शेतीला पाणी पुरवण्याचे प्रस्तावित असल्याने वाया जाणारे अधिकचे पाणी बचत होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.या सर्व कामाचा पाठपुरावा खासदार उन्मेष दादा पाटील यांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे केल्याने हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली.
अभियांत्रिकी आविष्कार पाहण्यासाठी गर्दी
वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्पाच्या कामास गती मिळाली असल्याने जलसिंचन क्रांतीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. या प्रगतीपथावरील कामास विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भेट देण्यासाठी येत आहे.आजपर्यंत अमृत वाहिनी पुणे, श्रम साधना ट्रस्टचे पोलिटेक्निक कॉलेज बांभोरी जळगाव सजीवनी पॉलिटेक्निक कॉलेज पुणे,यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पथके दहा दिवस येथे जाऊन कामकाजाची अवलोकन करीत आहे .या ठिकाणी आधुनिक मशीनरी द्वारे सुरु असलेली काम पाहण्यासाठी तालुक्यातील व परिस रातील अनेक नागरिक आपल्या परिवारास या कार्यस्थळावर भेट देेत आहेत. तालुक्याच्या परिसरातील शेकडो नागरिक, तरुण या कार्य स्थळी दररोज या अभियांत्रिकी अविष्काराचे साक्षीदार होण्यासाठी भेट देत आहे.
वरखेडे लोंढे बँरेज वर्ष अखेर पूर्ण होणार
वरखेडे लोंढे बँरेज पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त करण्यात आल्या आहेत .केंद्राच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत वरखेडे लोंढे बँरेज
चा समावेश झाल्याने या कामासाठी१००% निधीची भरीव तरतूद झाली हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी समुद्रात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान व मशिनरी या ठिकाणी वापरण्यात येत आहे. यामुळे काँक्रिटीकरणाची गुणवत्ता अबाधित राहत असून वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याने शेतकरी राजा बरोबर मला देखील समाधान असल्याची भावना खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली आहे.