पाडळसरे धरणास नाबार्ड अंतर्गत मिळणार 1500 कोटींचा भरीव निधी,राज्य मंत्री मंडळाची मंजुरी
अमळनेर-एक रकमी मोठ्या निधीसाठी सुरू असलेला पाडळसरे धरणाचा लांबता प्रवास थांबविण्याचे धोरण अखेर जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून भाजपा सरकारने आखले असून या धरणासाठी नाबार्ड अंतर्गत एक रकमी 1500 कोटींचा निधी मिळण्यासाठी राज्य मंत्री मंडळाने मुंबईत झालेल्या बैठकीत मंजुरी दिल्याची माहिती आ स्मिता वाघ यांनी दिली. या मंजुरीमुळे गिरीश महाजन हे शेतकरी बांधवांसाठी रिअल हिरो ठरले असल्याचेही आ. वाघ यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्णत्वास यावे यासाठी दीर्घ मुदतीचे 15 हजार कोटी कर्ज नाबार्ड च्या माध्यमातून घेण्यास आज मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली,सरकारच्या या निर्णयामुळे येत्या तीन वर्षात संबधित प्रकल्प पूर्ण होऊन 2.90 लाख हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होण्यासह 891 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा उपलब्द होण्यास मदत होणार आहे,.विशेष म्हणजे ना. गिरीश महाजन यांच्या अथक प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यातील काही सिंचन प्रकल्पांना यामाध्यमातुन निधी उपलब्ध होणार असून यातून तब्बल 1500 कोटी निधी अमळनेर तालुक्यातील प्रलंबित असलेल्या निम्न तापी पाडळसरे प्रकल्पास देण्यात येणार असल्याचे आ स्मिता वाघ यांनी सांगितले.सदर मंजुरी बद्दल आ स्मिता वाघ यानीं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे तमाम जनतेच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले आहेत.दरम्यान पाडळसरे धरणाच्या पूर्णत्वासाठी 2300 कोटी रकमेची आवश्यकत असताना कोणत्याही परिस्थितीत मोठा निधी मिळवायचा यासाठी गेल्या काही वर्षांपासून आ स्मिता वाघ यांचा सतत पाठपुरावा सुरू होता,केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळविण्यात त्यांना यश आल्यानंतर त्यांचा उत्साह वाढून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून त्यांनी जोमाने पाठपुरावा केला होता,यामुळे या प्रकल्पास निधी देण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने आखले होते.मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील प्रकल्पासाठी 15000 कोटी दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव केल्यानंतर त्यात पाडळसरे प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता,राज्य शासनास ही रक्कम उपलब्द झाल्यानंतर यातून 1500 कोटी पाडळसरे कडे वर्ग होणार असून आता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण होऊन अमळनेर सह चार तालुके सिंचनाखाली येणार असल्याचे स्मिता वाघ यांनी सांगितले.ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या आशा जिवंत होत असून हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर निश्चितच या परिसरातील शेतकऱ्यांच्या घराघरात गिरीश महाजन यांचे फोटो लागतील असा विश्वास देखील आ सौ वाघ यांनी व्यक्त केला आहे.