भडगांव (प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील तांदुळवाडी येथील जि.प. मराठी शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचे जिव धोक्यात आले असून विद्यार्थी वर्गात जीव मुठीत असल्यागत बसत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
शाळेच्या गच्चीला तळे गेल्याचे दिसून येत असून वर्गात पाणी देखील साचल्याचे दिसत आहे.
तांदुळवाडी येथील जि. प. मराठी मुलांची शाळेच्या इमारतीला पन्नास वर्षे झाल्याने पुर्ण पणे शाळा जीर्ण झाल्याचे दिसुन येत आहे. त्यात शाळेच्या भिंतीला चारही बाजुने मोठमोठे खड्डे व तडे गेले आहे .तसेच इमारतीचा गच्ची पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे कोसळण्याची शक्यता दिसत आहे त्यात एक ते चार वर्गालाच्या मुलांना बसायला देखील जागा नसल्याने मुख्याध्यापकांना व पालकांना चिंतेचा विषय बनला आहे.
जि. प. प्राथमिक मराठी शाळा वर्ग दुरूस्ती बाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार प्रस्ताव देखील पंचायत समिती भडगाव यांच्याकडे पाच वेळेस पाठवून देखील त्याचे प्रतिउत्तर मिळालेच नाही. पन्नास वर्ष पूर्ण झालेली शाळेच्या इमारतीसाठी ग्रामपंचायतीने ठराव देखील पाठविललेला असतांना मुख्याध्यापकांच्या समजुतीसाठी दोन वेळेस सरकारी इंजिनीअरने आराखडा तयार करुन इमारती दुरुस्तीसाठी कुठलिही कार्यवाही केलेली नाही.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत दादाभाऊ पाटील, अनिल युवराज खैरनार (सदस्य), प्रल्हाद संतोष पवार (पालक), रविंद्र बोरसे (मुख्याध्यापक) शाळेत वारंवार या विषयावर चर्चा केली मात्र शासन स्तरावरून काही मार्ग निघत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
मुलांना शाळेत दररोज वर्गातील पाणी फेकाव लागत आहे अशा काही कारणाने मुलांच्या शिक्षणाला अडथळा येत आहे आणि केव्हा भिंत व गच्ची कोसळून जाईल त्या कारणाने 15 आँगस्ट नंतर मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी पालकांमध्ये चर्चा ऐकण्यास येत आहे तसेच मुलांच्या जीवाला धोका असल्या कारणाने गट विकास अधिकारी भडगाव यांनी तात्काळ इमारत दुरुस्तीची कार्यवाही करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.