गेल्या आठ वर्षांपूर्वी रोहित बडगुजर या मुलाला गुलियन-बार्रे सिंड्रोम हा आजार झाला होता. यामुळे मानेखालील संपूर्ण शरीराला लकवा झाला होता. परिणामी शरीराची हालचाल बंद झाली. श्वसनाला मदत व्हावी म्हणून मानेत छेद देत कुत्रिम रस्ता बनवत ट्रेकेओस्टॉमी ट्यूब टाकण्यात आली. यामुळे श्वसन प्रक्रिया सुरु आहे. तसेच पोटात एक नळी टाकून पाणी स्वरूपात जेवण दिले जाते. ट्रेकेओस्टॉमी हि जुनी झाली असल्याने ती स्वच्छ करताना तुटून ट्यूबचा तुकडा श्वास नलिकेत खोलवर जाऊन उजव्या फुफुसाच्या मार्गामध्ये अडकला. परिणामी रुग्णाला श्वासोच्छवासाला त्रास झाला. दरम्यान भुसावळ येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये श्वसनासाठी नळी टाकून रुग्णाला स्थिर करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आले. रुग्णाला धाप लागत असल्याने सर्वप्रथम रुग्णाचा एक्सरे काढण्यात आला, त्यांनतर डॉक्टरांनी उपचारासाठी लागणार्या साहित्यांची जमवाजमव करत रिजिड ब्रॉन्कोस्कोपी शस्त्रक्रिया करत अडकलेला तुकडा यशस्वीरीत्या काढला. रुग्णाच्या शरीरातून फॉरेन बॉडी काढल्यानांतर नवीन ट्रेकेओस्टॉमी ट्यूब लावण्यात आली. यानंतर एक दिवस रुग्णाला ऍडमिट ठेवले असून पुढील दिवशी रुग्णाची प्रकृती नीट झाल्याने सुट्टी देण्यात आली.या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ.मिलिंद जोशी, डॉ.पंकज चौधरी, डॉ. जोशी, डॉ. वरून देव, इ एन. टी. तज्ञ् डॉ.विक्रांत वझे, डॉ. हर्षल, डॉ. श्रृती यांच्यासह भूलतज्ञ डॉ. ऋतुराज काकड, डॉ. सागर व्यास, डॉ. शीतल, डॉ. हर्षा, डॉ. प्राजक्ता, डॉ. शिवाजी यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्जरी आयसीयू मध्ये सुषमा तायडे, शोले पटेल, पूजा गांजरे, धनश्री कंबे, डॉ. शशांक पवार यांनी रुग्णाची देखभाल केली.
टिमवर्क महत्वाचे – डॉ. विक्रांत वझे डॉ. मिलींद जोशी
फॉरेन बॉडी रुग्णाच्या शरीरातून इमरजन्सी काढण्याच्या केसेसमध्ये सर्जन कितीही अनुभवी असला तरी प्रत्येक केस ही नवीन असते. “ एअर वे रिलेटेड” अर्थातच श्वसन व्यवस्थेशी संबंधित शस्त्रक्रिया या कायमच भुलतज्ञांच्या टिमसोबत केल्याने यशस्वी ठरतात. भुलतज्ञांचे भुल देण्यासाठी आणि श्वसन नियंत्रीत ठेवण्याच्या कामात मोलाचा सहभाग असल्याचे डॉ. विक्रांत वझे व डॉ. मिलींद जोशी यांनी सांगीतले.
पोटाला चिमटा देवून करतोय उपचार
२०१२ मध्ये रोहितला अचानक शरीरात ताकतच नसल्याचे जाणवले आणि श्वसनाला त्रास होऊ लागला. जळगाव येथील खाजगी हॉस्पितळात नेले असता जीबीएस हा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनतर मुंबई, पुणे येथीलही दवाखान्यात त्याचे उपचार केले मात्र आजार पूर्ण बारा झाला नाही. आता पुन्हा रोहितला धाप लागू लागल्याने आम्ही भुसावळ येथील दवाखान्यात दाखवले त्यांनतर डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयात आलो, यावेळी रोहितची प्रकृती पाहता डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया केली आणि श्वासनलिकेत अडकलेला ट्यूबचा तुकडा काढत माझ्या मुलाला पुन्हा नॉर्मल श्वास घेता येत आहे. २०१२ पासून ते आता पर्यंत १२ ते १४ लाख रुपये दवाखण्याचा खर्च झाला. काल वेळेवर माझ्या मुलाला उपचार मिळाले त्यामुळे त्याला आजचा दिवस पाहता आला. वडा-पाव चा माझा व्यवसाय आहे, हात मजुरीवर संसाराचा गाडा ओढणे सुरु आहे. रोहित हा हुशार मुलगा आहे ७ वी पर्यंत त्याने पहिला क्रमांक चुकविला नसल्याचेही रोहित चे वडील संजय बडगुजर यांनी सांगितले.