गौरवकुमार पाटील / अमळनेर – अमळनेर ते मारवड रस्त्यावर असलेल्या मुंदडा हायस्कूल समोरच्या साईलीला पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २८ हजार रुपयांचे १६०० लिटर डिझेल चोरून नेले असल्याचे काल दिनांक २८ रोजी दुपारी उघलकीस आले असून याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.
रात्री नेहमीच वर्दळीच्या अमळनेर ते मारवड रस्त्यावरील एकमेव असलेल्या साईलीला पेट्रोल पंपावर काल दिनांक २७ रोजी रात्री ११:३० नंतर कर्मचारी रीडिंग घेऊन झोपून गेले असता एक अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून दोन तीन वेळा घिरट्या मारीत होता असे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले
असता त्यांनी रात्री १ वाजेपर्यंत पाळत ठेवली मात्र नंतर थकून गेल्याने झोपून गेले व दिनांक २८ रोजी पहाटे नियमितपणे काम सुरू केले असता सकाळी १०:३० वाजता पेट्रोल पंपाचे मॅनेजर भूषण देविदास साळुंखे हे आले व त्यांनी पेट्रोल व डिझेलचा साठा तपासणी करून पाळताळणी केली असता डिझेलचा एकूण साठ्यातून १६०० लिटर डिझेलची तफावत आढळून आल्याने कर्मचारी वर्गात विचारून ताळमेळ पाहता रात्रीचे सीसीटीव्ही कॅमेरे व पुटेज तपासणी केली असता रात्रीच्या १:३० ते ५ च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने पेट्रोल पंपाच्या टाकी जवळ तपासणी करतांना एक इसम तोंडाला रुमाल बांधून नळी व पंपाच्या यंत्राने डिझेलची चोरी करीत असल्याचे दिसून आले ,
म्हणून एकूण १ लाख २८ हजार रुपयांचे १६०० लिटर डिझेलची चोरी रखवालीतून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद विजय अशोक इंदाईत राहणार भोरटेक यांनी काल दिनांक २८ रोजी सायंकाळी पोलीस ठाण्यात दिल्यावरून मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय राहुल फुला हे करीत आहेत , अमळनेर ते मारवड रस्त्यावर व अमळनेर ते बेटावद रस्त्यावरील असलेल्या दोन्ही पेट्रोल पंपावरून डिझेल चोरीच्या घटना या सलग काही दिवसांच्या खंडाने घडून आल्याने पेट्रोल पंप चालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साई लीला पेट्रोल पंपा वरून मिळालेल्या सीसीटीव्ही च्या पुटेज वरून मारवड पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून लवकरच चोरट्यांना पोलीस शोधून काढतील असा विश्वास एपीआय राहुल फुला यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केला.