जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार साहेब म्हणजे राजकारणाच्या महासागरातील ‘दीपस्तंभ’ असून मुत्सद्दी राजकारणी, शेतीतज्ञ, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून ओळख आहे अशा ‘महानेत्यास’ वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ‘नजरकैद’शी बोलतांना राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिल्या आहेत.
राजकारणातील अपराजित योद्धा असलेलं व्यक्तिमत्व खा. शरदचंद्र पवार यांचा दि.12 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने पवार साहेबांना मानणाऱ्या प्रत्येकासाठी हा उत्सवच असतो.
जळगाव जिल्ह्यात देखील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो व साहेबांच्या मार्गदर्शनाने जनसेवा घडो हीच वाढदिवसाच्या निमित्त मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं एकनाथराव खडसे यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना खा. शरदचंद्र पवार यांना शुभेच्छा दिल्या.