जळगाव :- पाळधी तालुका धरणगाव येथील रहिवाशी युवा कार्यकर्ते तथा पत्रकार भूषण महाजन यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी विभागीय संघटक अनिल नाळे, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, जळगाव पुर्व जिल्हाध्यक्ष सचिन संतोष चौधरी, कार्याध्यक्ष वसंत पाटील, निरीक्षक शालिग्राम मालकर, महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी कोल्हे,अँड वैशाली माळी, महिला जिल्हा कार्याध्यक्ष निवेदीता ताठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश महाजन ,यासह समता सैनिक उपस्थित होते निवडीचे सर्वत्र अभिनंदन कौतुक केले जात आहे.