सागरपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी स्त्रिया शेती आणि मासेमारीच्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.किंबहुना घराघरात मातृसत्ताक स्त्रीसत्ताक विचारधारा आजही पहायला मिळते.साऱ्या देशात आणि महाराष्ट्रात स्त्री अत्याचारांच्या कथा आणि व्यथा ऐकायला येत असताना मनुस्मृतीच्या विरोधातील सत्य सुन्दर संविधानिक जगणे हजारो वर्षे जेथे पाहायला मिळते. ती ही मुबंई ठाणे रायगड या ऐतिहासिक परिसरातील जुनी गावठाने आहेत.आज येथे गावठाने आणि मासळी बाजारांच्या जमीन मालकीचा लढा उभा राहतोय.ममतामयी नारी जातीला अर्थात स्त्रियांना अधिकार कसे आणि कुणी द्यावेत हा वस्तुपाठ आज आगरी कोळी गावठाने देत आहेत अर्थात हा देशभरात जवळ जवळ दुर्मिळ असणारा मातृसत्ताक विचार आहे.साहित्यिक पत्रकार यांनी प्रत्यक्ष मासळी बाजार पाहून साऱ्या जगाला आदर्श देणाऱ्या कोलीय अर्थव्यवस्थेचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन अनुभव घ्यावा. जगण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांनाही हवे असे ज्यांना वाटते त्यांनी मासळी बाजार पाहावेत.2000 हजार वर्षांपासून एकविरापुत्र बुद्ध , सम्राट अशोक याच्या काळात येथील महिलांनी व्यक्तिगत साधना आणि त्याग भावनेने स्वतःच ही अर्थशक्ती नारीशक्ती निर्माण केली होती.त्यामुळेच येथील प्रत्यक गावात पाहिले प्रार्थनास्थळ हे कोणत्याही मातेचेच दिसते.कुठे एकविरा,जीवदानी,शितलामाता, केरुमाता, हिंग्लआयमाता,गावदेवी माता यांच्या स्वरूपात केवळ मातृदेवता पूज्य मानल्या गेल्या आहेत. कमळासारख्या सुकोमल नारी रत्नांनी पुरुषांसारखे धाडशी जीवन जगून मुबंई सारख्या आंतरराष्ट्रीय व्यापारी शहरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा मासळी मार्केटच्या रूपाने उमटविला आहे ही सांस्कृतिक अर्थाने देशासाठी अभिमानाची बाब आहे.कोणत्याही सामाजिक दडपणाखाली स्त्रियांचा बौद्धिक विकास होऊ शकत नाही. आगरी कोळी मातृसत्ताक संस्कृतीत स्त्री स्वातंत्र्य कुटुंब संस्थेत दिसून येते म्हणूनच मासळी मार्केटच्या जागा या स्त्री स्वातंत्र्याच्या संविधानिक विचारांची उगमस्थान असलेली दुर्मिळ ठिकाणे म्हणून भूमाफिया बिल्डर राजकारणी एस आर ए प्रकल्पापासून वाचविली पाहिजेत.
आजच्या लोकसभेतील खासदार स्त्रिया,विधानसभेतील स्त्रिया,हॉलिवूड बॉलिवूड येथील अभिनेत्या,उच्चवर्णीय ब्राह्मण, मराठा वैश्य स्त्रिया,धनवान गरीब पीडित स्त्रिया यांनीही एकविरा मातृसत्ताक विचार धार्मिक सामाजिक आणि अर्थशास्त्रीय अर्थाने अभ्यासायला हवीय.सर्वच क्षेत्रात पुरुष यशस्वी होऊ शकत नाहीत स्त्रियाही होऊ शकतात,सूक्ष्म विचार करता स्त्रिया अधिक यशस्वी होतात हे सत्य कोळीवाडा मासळी मार्केटमध्ये जाणवते. मातृत्वाईतकेच धार्मिक उच्च स्थान स्त्रिया प्राप्त करू शकतात हे धावलारी अर्थात स्त्री पुरोहित बनून आगरी कोळी मातृसत्तेने सिद्ध केलेली गोष्ट आहे.केवळ गृहलक्ष्मी नव्हे तर अखिल विश्वात पूजनीय बनण्याच्या सामर्थ्य स्त्रियांमध्ये आहे हे 2000 वर्षांपासून कार्ला एकविरा आई सांगत आलीय.तुम्ही राग द्वेष मोह या दुर्गुणाचा नाश करून वर्तमान सांसारिक दुखातूनही मुक्त होऊ शकता हे आई एकवीरेंचा विचार सांगतो.आई एकवीरेंचा बाजूलाच प्रजापती गौतमीची अर्थात जोगीनिमातेची मूर्ती पुजली जाते.या मातेमुळेच कोळीवाड्यातील मच्छिमार महिलांचे धार्मिक आर्थिक आणि राजकीय तत्वज्ञान उगम पावले. हीच जोगीनिमाता प्रजापती गौतमिमाता ज्या एकविरामातेच्या भगिनी आहेत त्यांनी भगवान बुद्धाची यासाठी प्रशंसा केली की तत्कालीन समाजव्यवस्थेत धर्मव्यवस्थेत स्त्रियांना पुरुषांची बरोबरी करण्याचे अधिकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.त्यामुळेच आगरी कोळी मातृसत्ताक संस्कृतीचा पाया घातला गेला.त्या म्हणतात “सर्व प्राण्यांमध्ये उत्तम बुद्ध वीरा! तुम्हाला माझे त्रिवार वंदन आहे.तुम्ही मला आणि समस्त स्त्री पुरुषांना दुःख सागरातून वाचविले आहे. महामाया एकविरेने भगवान बुद्धाला अनंत लोकांच्या हितासाठी व सुखासाठी जन्म दिला.भगवंतांनी व्याधी आणि दुःख पीडित लोकांचे दुःख दूर केले. “स्त्री हीच कुटूंबाचा उद्धार करणारी आहे.तीच आपला आई म्हणून निसर्गनिर्मित प्रथम गुरू आहे.तीच समाजप्रबोधन करू शकते.म्हणूनच स्त्रीला स्त्री बधनांच्या दास्यातून मुक्त केली पाहिजे.ती सामाजिक क्रांती घडवू शकते. बुद्धांची विचार धारा सांगते. “स्त्री ही जगात सर्वश्रेष्ठ आहे ती जगाची गुरुकिल्ली आहे” या लेखात आलेला बुद्धविरा हा शब्द एकविरा या शब्दाचे आजचे नाते सांगतो. दोन हजार वर्षाच्या जगातील साऱ्या बौद्ध पाली साहित्यात हे शब्द पाहायला मिळतात म्हणूनच आई एकविरा हीच कोलीय वंशाची महामाया एकविरा होय.आज मासळी मार्केट मध्ये आपल्या जमीन हक्कांसाठी लढायला उभ्या राहिलेल्या आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी माता भिगिनी याच मातृसत्ताक विचार धारेतून नव्या लोकशाही भारतात स्त्री पुरुष समतेच्या न्यायाने आपला जमीन हक्क मागता आहेत.आपणही याल ना लढायला!. आपल्या आई बहीण मावशी आणि आज्जीसाठी! जय एकविरा आई!
सुलोचनापुत्र राजाराम पाटील.
मो.8286031463,उरण रायगड