जळगाव – राज्य शासनाच्या नदीजोड प्रकल्पाच्या सल्लागार पदी तापी विकास महामंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही.डी.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश आज दि.2 ऑगस्ट 2019 रोजीराज्याच्या जलसंपदा विभागाने काढले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, एकात्मिक राज्य जल आराखड्यामध्ये राज्यातील विविध विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात अतिरिक्त पाणी वाळविण्यासाठी विविध नदीजोड प्रकल्प व वळण योजना प्रस्तावित आहे.या योजनेच्या कामी मार्गदर्शन करणे कमी तांत्रीक सल्लागार म्हणून व्ही.डी.पाटील यांची शासनाने एक वर्षाकरिता नियुक्ती केली आहे.
व्ही.डी.पाटील, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता, जळगाव यांना तापी, गोदावरी व कोकण खोऱ्यातील विविध नदीजोड प्रकल्पाच्या योजनांचा प्रदीर्घ अनुभव व याबाबतचा सखोल अभ्यास असून त्याांची नेमणूक झाल्यास शासनास विविध नदीजोड प्रकल्पाबाबत ताांत्रिक निर्णय घेतांना मोठी मदत होणार असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी देखील व्ही.डी. पाटील यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती.ती जबाबदारी त्यांनी दमदार पणे निभावली आहे. जलसंपदा विभागातील तज्ज्ञ व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राज्यभर आहे.जिल्ह्यात तापी पाटबंधारे विभागा अंतर्गत राबविण्यात आलेले आजवर च्या प्रकल्पांमध्ये यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्यातील अशा अभ्यासू व्यक्तीची राज्य शासनाच्या नदी जोड प्रकल्पाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात आनंद होत आहे.