गौरवकुमार पाटील / पाडळसरे – येथून जवळच असलेल्या भोरटेक रेल्वे स्टेशन जवळ झाडी येथील ५४ वर्षीय इसमाने काल दिनांक २५ रोजी दुपारी ४ वाजता मालवाहतूक रेल्वे गाडीखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
कामानिमित्त सुरत येथे वास्तव्यास गेलेले साहेबराव रामराव पाटील हे झाडी या मूळ गावी लहान भाऊंचा मृत्यू झाल्याने गावी आले होते व महिन्याभरापासून गावी होते मात्र काल दिनांक २५ रोजी सायंकाळी सुरत कडून भुसावळ कडे जाणाऱ्या अमळनेर ते बेटावद दरम्यान भोरटेक स्टेशनच्या पूर्वेला पोल क्रमांक २४३ /३४/३६ दरम्यान रेल्वे मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोको पायलट यांनी स्टेशन अधीक्षक यांना दिली, स्टेशन मास्तर मधुसूदन प्रसाद यांनी रेल्वे पोलिसांना दिल्याने रेल्वेचे सहाय्यक फौजदार मधुकर विसावळे व पोलीस नाईक रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पंचनामा केला , वैद्यकीय अधिकारी डॉ जी एम पाटील यांनी सकाळी शवविच्छेदन करून नातेवाईकांना सोपविल्याने झाडी गावी त्यांचेवर दिनांक २६ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पश्यात पत्नी ,एक मुलगा ,सून ,भाऊ असा परिवार आहे , रेल्वे पोलिसांत स्टेशन मास्तराने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कारण समजू शकले नाही पुढील तपास रेल्वेचे सहाय्यक फौजदार मधुकर विसावळे हे करीत आहेत.