मुंबई,- अभिनेत्री पायल घोष ने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री पायल घोष ने ट्विट करून खा. रामदास आठवले यांचे आभार मानले.
पायल घोष ने केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, आरपीआयच्या महिला शाखेसाठी उपाध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल रामदास आठवले यांची मी आभारी आहे. माझा सन्मान केला आहे.
एक महिला म्हणून मी महिला समुदायाची सेवा करण्यासही आनंदित असल्याचे अभिनेत्री पायल घोष ने म्हटलं आहे.