चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव धुळे पॅसेजर चा जुना रॅक बदलून नव्याने मेमु ट्रेन चा रॅक सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डा च्या वतीने तसे आदेश सेंट्रल रेल्वे ला प्राप्त झाले आहेत. तसेच मेमु ट्रेन कार्यान्वित होण्यासाठी भुसावळ डिव्हिजन मार्फत हालाचाली सुरू झाल्या आहेत. धुळे,चाळीसगाव पॅसेंजर ला धुळे, मुंबई ४ बोग्या तसेच धुळे,पुणे २ बोग्या जोडल्या जात होत्या मात्र मेमु ट्रेन सुरू झाल्यास बोग्या बंद करण्यात येणार असल्याने धुळे,चाळीसगाव येथून मोठ्या प्रमाणात मुंबई व पुणे येथे जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने मेमु ट्रेन सुरू करण्यात नये यासाठी चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना दि २६ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदणा द्वारे मागणी करण्यात आली आहे.
मेमु ट्रेनला दोन्हीही बाजूला इंजिन असल्याने ( पावर कार इंजिन ) त्या रॅक ला इतर कुठल्याही बोग्या जोडण्याची सोय नसल्याने यापूर्वी ज्या बोग्या धुळे येथून धुळे,चाळीसगाव पॅसेंजर ला धुळे, मुंबई ए सी व सिलीपर ४ बोगी तसेच धुळे,पुणे सिलीपर २ बोग्या अमृतसर एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेस ला जोडले जात होत्या . मात्र मेमु ट्रेन सुरू झाल्यास इतर बोग्या जोडण्याची सोय नसल्याने त्या बोग्या जोडल्या जाणार नाही. त्यामुळे धुळे,चाळीसगाव येथून मुंबई व पुणे येथे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. जर रेल्वे विभागाने मेमु ट्रेन सुरू केली तर धुळे येथून मुंबई,पुणे सुरू असलेल्या बोगी बंद न करता त्या चाळीसगाव येथून रेल्वे गाड्यांना जोडण्यात येण्याची व्यवस्था करावी. .सध्या कोरोना संसर्गामुळे सर्वच रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. थोड्या फार प्रमाणात रेल्वे सुरू झाल्या असल्या तरी त्या लांब पल्याच्या रेल्वे सुरू आहेत . मात्र दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार,व्यावसायिक व सर्व सामान्य प्रवाशांना अत्यावश्यक असणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नसल्याने बाहेर गावी जाण्या येण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होत असून तात्काळ धुळे चाळीसगाव पॅसेंजर सुरू करण्यात यावी . मात्र धुळे चाळीसगाव मेमु ट्रेन सुरू केल्यास मुंबई, पुणे जाण्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे . मेमु ट्रेन सुरू न करता पूर्वी प्रमाणे म्हणजेच एका बाजूला असलेल्या इंजिनचा रेल्वे रॅक सुरू करण्यात येवा.अन्यथा रयत सेनेच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना दि २६ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदणा द्वारे दिला आहे.निवेदनाच्या प्रती जळगाव मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील, भुसावळ विभागाचे डि आर एम यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शहराध्यक्ष योगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले ,विलास मराठे ,बाळू पवार, किरण पवार , मिलींद लोखंडे आदींच्या सह्या आहेत