राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून थोड्यावेळा पूर्वीच दिली आहे.
अजित पवार यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधानतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं कारण नाही, माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांती नंतर मी लवकरच आपल्या सोबत कार्यरत होईल असं म्हटलं आहे.