व्हॉट्सअॅप बिझिनेस ग्राहकांना सेवेसाठी लवकरच शुल्क आकारले जाणार असल्याचं नुकतंच फेसबुक ने एका ब्लॉग वर जाहीर केलं असून
व्हॉट्सअॅप बिझिनेसमध्ये पन्नास कोटी वापरकर्ते आहेत.त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे.
मजकूर वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप सध्या काही व्यवसायांना कमी शुल्क आकारतो.व्हॉट्सअॅप बिझनेस
लवकरच आपल्या बिझिनेस चॅट सेवेसाठी कंपन्यांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात करेल, अशी माहिती गुरुवारी फेसबुकच्या मालकीच्या मेसेजिंगच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये दिली.
व्हॉट्सअॅपने व्यवसाय सेवांसाठी किंमतींचा तपशील जाहीर केला नाही. परंतु व्यवसाय अॅप पूर्णपणे कायम राहिल.असं स्पष्ट केलं आहे.
ईमेलऐवजी अॅपद्वारे वापरकर्त्यांना पावती आणि कन्फर्मेशन स्मरणपत्रे यासारख्या गोष्टी पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅप सध्या काही व्यवसायांना थोडासा शुल्क आकारत आहे.
यामुळे आता सर्वात मोठे मॅसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअप बिझनेस वापरण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागू शकतात.